माझी शाळा


"शाळा"

शाळा असते दुर
अभ्यास नसेल पुर्ण तर काळजात होते चुर्र
शिक्षकांचा मार आणि बाईंचे बोल
मन मात्र यांचे असते खुप खुप खोल.

इंग्रजी च्या तासाला आ वासून बसणारी 
शा.शि. ला खिदळत पळणारी
गणितात चुकतात यांची कोडी
मराठी ची वेगळीच गोडी.

विज्ञानात रसायने विसरणारी
इतिहासाचा कायापलट करणारी
हिंदी मध्ये मराठीची मिसळ घडवणारी
भूगोलाचा नकाशा बदलणारी.

रडुन हसणारी,
रूसून हळूच बोलणारी,
कधी गट्टी तर कधी घट्ट मिठी मारणारी
ही मुलं 
असतात ना जेंव्हा दुर
शाळेच्या देखिल काळजात होते चुर्र..